डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या चळवळीचा दृष्टीकोण

250.00

आंबेडकरी चळवळीचा इतिहास लिहिताना तो फक्त माहिती स्वरूपात न लिहिता तो दिशादर्शक स्वरूपात लिहिनारे आदरणीय बाबाराव बाभळे सरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या चळवळीचा दृष्टीकोण हे पुस्तक वाचना/अभ्यासा साठी उपलब्ध आहे.

या अगोदर त्यांनी कांशीराम का मायाजाल पुस्तक लिहून बहुजनवाद किंवा बसपा हे एक मृगजळ आहे. त्याच्या आंबेडकरी तत्वज्ञानाशी काही संबंध नाही हे पुराव्यानिशी सिद्ध केले होते. तसेच आंबेडकरी म्हणजेच रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण करून वैचारिक लढाईचे मोठे हत्यार उपलब्ध करून दिले होते.

नवीन वाचकांना ३२८ पानाचे पुस्तक मोठे वाटत असले तरी खैरमोडे ,कांबळे आणि किर यांच्या चारीत्र्यखंडा पेक्षा खुप लहान आहे. बाभळे सरांचे पुस्तक विकत घेउन वाचताना बाकी चरित्रग्रंथ वाचायची गरज पडत नाही. त्यामुळे वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होते. फाफड पसारा न करता महत्त्वाचे सर्व संदर्भ यात समाविष्ट करताना त्यांची तारीफच करावी लागते.

सहसा पुस्तक वाचताना ५-१०% भाग अंडरलाइन करावा लागतो पण हे पुस्तक वाचताना वाचक ५०-६० % भाग अंडरलाईन करून ठेवतील असे अनुभवावरुन वाटते.

१९२० ते १९५६ आणि त्यानंतरच्या परिस्थितीचे चित्रण करताना विघटनाची कारणे व ते  थांबवण्यासाठीचे उपाय यासाठी त्यांनी बऱ्याच दिशादर्शक सुचना मांडल्या आहेत.

याचा अभ्यास केला तर भविष्यात होणारे विघटन रोखता येउ शकतात. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि विकत घेऊन जपून ठेवावे. यापुस्तकाची गरज आजही आहे आणि ३०-४० वर्षांनंतर ही राहिल. पण कदाचित हे पुस्तक तेव्हा उपलब्ध नसेल. …………….

बाभळे सरांनी हे पुस्तक लिहून आंबेडकरी चळवळीवर खुप मोठे उपकार केले, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही …… ……..

संदीप राऊत…

1 in stock

Category: